Spread the love

Live marathipepar, प्रणिता पवार [ state employee shasan Nirnay ] : गट ब ( अराजपत्रित) , गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचारी यांच्या वयाच्या 50 / 55 व्या वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याकरिता पुनर्विलोकन समितीची रचना करण्याबाबत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 च्या नियम 10 (4) व नियम 65 (अ)नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वयाच्या 50 / 55 व्या वर्षी अथवा तीस वर्षे अहर्ताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल , त्यावेळी त्यांचे सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्ती करण्याबाबत एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे .

सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक तीन अ नुसार विभाग प्रमुखांना पुनर्विलोकन विषयक सल्ला देण्यासाठी समिती गठीत करणे आवश्यक असल्याने , निबंधक भागीदारी संस्था कार्यालयाने निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे दिनांक 28 जुलै 2023 रोजीचे पत्र यानुसार पुनर्विलोकन समिती गठित करण्याची शासनास विनंती केली आहे . त्यानुसार निबंधक भागीदारी संस्था कार्यालयातील गट ब (अराजपत्रित) गट क आणि गट ड कर्मचारी यांच्या वयाच्या 50 / 55 व्या वर्षापलीकडे अर्हताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याकरिता समिती गठित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

यानुसार आता राज्य शासनाने निबंधक भागीदारी संस्था कार्यालयातील गट ब अराजपात्रित गट क आणि गट ड कर्मचारी यांचे वयाच्या 50 / 55 व्या वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याकरिता खालील प्रमाणे समितीचे गठन करण्यात आले आहेत.

या संदर्भात विधी व न्याय विभागाकडून दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *