लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय – निमशासकीय तसेच इतर पात्र असणारे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून राज्य शासनास पाठपुरावा करण्यात आलेला आहे , परंतु राज्य शासनांचे कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहेत .
देशांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे , त्या अनुषंगाने देशांमध्ये 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय ( Retirement Age ) 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्यात आलेले आहेत . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा याकरीता राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वारंवार राज्य शासनांकडे पाठपुरावा करण्यात येत आहेत .
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे प्रस्तावित : राज्य शासनांकडून या वर्षी सुमोर 50,000 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . परंतु रिक्त जागांचा आकडा काढल्यास रिक्त पदांची जागा 2.5 लाख इतकी आहे . यामुळे पदभरती केल्यानंतर देखिल रिकत पदांचा आकडा मोठा असणार असल्याने , सदर रिक्त पदांवर पदभरती करण्यापेक्षा सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी वाढविल्यास राज्य सरकार अधिक फायद्यामध्ये असणार आहे .यामुळे राज्य शासनांकडून सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्याची बाब प्रस्तावित आहे .
सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याऐवजी राज्य सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांना वयाच्या 70 वर्षांपर्यंत कंत्राटी पद्धतीने 20,000/- इतकी मानधन तत्वावर घेणेबाबत निर्णय घेतला आहे . परंतु या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून विरोध केला आहे . यामुळे सेवानिवृत्तीचे 60 वर्षे करणे राज्य सरकारला भाग पडणार आहे .
मिडीया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत राज्य शासनांकडून समितीचे गठण करण्यात आले होती , सदर समितीने नुकतेच आपला अहवाल राज्य शासनांस सादर करण्यात आलेला आहे . सदर अहवालांवरुन राज्य शासनांकडून सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत , निर्णय घेण्यात येणार आहे , याकडे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !