Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Retirement Age 60 year Need & government bhumika ] : जुनी पेन्शन योजना नंतर राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे ही आहे , केंद्र सरकार तसेच देशातील 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले आहे . यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा  (additional 2 year service benifit ) लाभ मिळत आहे.

सदर केंद्र सरकार व 25 राज्य सरकार प्रमाणे महाराष्ट्र राज्यात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे अशी मोठी मागणी राज्यातील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वर्षापासून केली जात आहे . यावर राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे.

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची आवश्यकता : राज्य शासन सेवेतील विविध विभागातील रिक्त पदांचा आकडा मोठा आहे . सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास, सदर  रिक्त पदाची तूट भरून निघेल , शिवाय अनुभवी कर्मचाऱ्यांची प्रशासन चालवताना चांगला फायदा होईल . तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने विचार केला तर कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची अतिरिक्त सेवेचा  ( two Years Additional Service Benefits ) लाभ मिळेल .

राज्य सरकारची भूमिका : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे बाबत राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका वेळोवेळी घेण्यात येते , तसेच कर्मचाऱ्यांना सकारात्मक आश्वासने दिले जातात .परंतु यावर अद्याप पर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही .परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे संदर्भात सकारात्मक आश्वासन दिले असून , येत्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *