Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन दिनांक 30 जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या / झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे त्या अनुषंगाने राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 28 जुन 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

मा.उच्च न्यायालयांमध्ये वरील प्रकरणे अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्य सदर याचिकांवर मा.उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद यांनी सदर दि.30 जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या / झालेल्या कर्मचाऱ्यांना 01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ तसेच ज्यानी मागील 12 महिनयांची सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ मंजुर करुन सुधारित निवृत्तीवेतन मंजुर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

यासाठी संबंधित सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केल्यास संबंधित कार्यालयांनी शासन निर्णयांमध्ये नमुद केलेल्या मा.उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त आदेशात नमुद केल्यानुसार संबंधितांना सुधारित सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर सदर लाभ सुधारित करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज सादर केलेल्या दिनांकाच्या मागील 3 वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक या पैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी असे मा. उच्च न्यायालयाने आदेश देण्यात आलेले आहेत .

तसेच सदर प्रकरणी कोणत्याही सेवानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यात येवू नयेत असेही आदेशित करण्यात आलेले आहेत . सदर प्रकरणांवर संबंधित कार्यालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा प्रकरणांचा त्यांच्या स्तरावरच तपासणी करुन निपटारा करावा असे आदेशित करण्यात आलेले आहेत .

या संबंधित वित्त विभागांकडून दिनांक 28 जुन 2023 रोजी निर्गमित सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता .

शासन निर्णय

आपण शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *