Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ reshan card stop news ] : रेशन कार्डच्या माध्यमातून देशातील नागरिकांना स्वस्त धान्य याशिवाय आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात . ही सुविधा रेशनकार्डाच्या प्रकारानुसार नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते .
सद्यस्थितीत रेशन कार्डच्या माध्यमातून देशातील तब्बल 80 कोटी नागरिक फायदा घेत आहेत , यामध्ये सदर रेशन योजनेच्या माध्यमातून गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या अधिक झाल्याचे , निदर्शनास येत असल्याने , सरकारकडून कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
यामध्ये पात्रते शिवाय स्वस्त रेशन घेणाऱ्यांची यादी तयार करून त्यांची नावे यामधून रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे . याकरिता सरकारकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे . ज्यांचे बनावट रेशन कार्ड आहेत , असे रेशन कार्ड दि.01 जानेवारी 2025 नंतर रद्द करण्यात येणार होते , परंतु सदर ई – केवायसी करिता माहे फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे , त्यानंतर सदर रेशन रद्द करण्यात येणार आहेत .
ज्यांची ई – केवायसी पुर्ण नसेल अशांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. ही केवायसी ही POS मशीनवर फिंगरप्रिंट द्वारे पडताळणी पुर्ण करण्यात येईल , याशिवाय आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर च्या माध्यमातून ओटीपी सबमिट करून ई केवायसी पूर्ण करू शकता .
यामुळे बनावट रेशन कार्ड यापुढे आळा बसणार आहे , अशा प्रकारचे रेशन कार्ड स्वस्त धान्य आरोग्याच्या सुविधा याकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाहीत .