Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ remal chakrivadal update news] : मान्सूनचा आगमन अंदमान मध्ये दिनांक 22 मे रोजी दाखल झाला आहे ,  तर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे देशभर वादळाने घेरले आहे .  आज पासून राज्यामध्ये रेमल चक्रीवादळ सक्रीय होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे .

केरळमध्ये दिनांक 31 मे पर्यंत मान्सूनचे आगमन होणार आहे तर , महाराष्ट्रामध्ये 10 जून दरम्यान कोकणात मान्सून सक्रिय होणार आहे . यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिनांक 15 जून दरम्यान मान्सून अधिक सक्रिय होणार आहे . या दरम्यानच्या कालावधीमध्ये मराठवाडा , विदर्भ विभागांमध्ये दिनांक 30 मे पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम असणार आहेत , तसेच यादरम्यानच्या कालावधीत उष्णतेची लाट देखील कायम असणार आहे .

रेमल चक्रीवादळ राज्यात आजपासून सक्रिय : मागील दोन दिवसापासून विदर्भ , मराठवाड्यामध्ये रेमल चक्रीवादळ सक्रिय झाला असून , आज पासून चक्रीवादळ अधिकच सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे . बंगालच्या उपसागरामध्ये दिनांक 26 मे रोजी मध्यरात्रीपासून ताशी 130 ते 135 किलोमीटर वेगाने बांगलादेश पश्चिम बंगाल किनारपट्टीवर चक्रीवादळ सुरू आहे  .

तर राज्यामध्ये दिनांक 30 मे पर्यंत रेमल चक्रीवादळ अधिक सक्रिय होणार असल्याची बातमी हवामान खात्याकडून समोर येत आहे ,  यामुळे शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना देण्यात आले आहे .

राज्यातील सदर रेमल चक्रीवादळ ताशी 60 ते 100 किलोमीटर वेगाने धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . राज्याच्या आग्नेय , पूर्व भागातील जिल्ह्यामध्ये सदर चक्रीवादळ अधिक सक्रिय होणार असल्याने , सदर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . यामध्ये मराठवाडा व विदर्भ विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *