Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ remal chakrivadal update ] : राज्यांमध्ये येत्या 48 तासांत रेमल चक्रीवादळ धडकरण्याची मोठी शक्यता आहे , दरम्यानच्या काळांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे . तर सदर काळांमध्ये राज्यातील हवामान कसे असेल ? याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

येत्या 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरांमध्ये चक्रिवादळ येण्याची मोठी संभावना आहे , यास चक्रिवादळास रेमन चक्रिवादळ असे संबोधण्यात आले आहेत . सदरच्या चक्रिवादळाचा परिणाम देशातील अनेक भागांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सदरचा रेमन चक्रिवादळ हे बंगालच्या उपसागरांमध्ये तयार झाले असून , त्याचा थेट परिणाम हा बांग्लादेशातील किनारपट्टीवरील प्रदेशांवर होणार आहे , तर भारतांमध्ये पश्चिम बंगाल , उडीसा राज्यातील किनापट्टीवरील भागांमध्ये परिणाम होणार असल्याची संभावना आहे .

सदर रेमन चक्रिवादळाची तिव्रता अधिक असल्याने , त्याचा परिणाम हा देशातील इतर राज्यांवर देखिल होणार असल्याची संभावना आहे , ज्यांमध्ये महाराष्ट्र , मध्यप्रदेश , कर्नाटक , आंध्र प्रदेश झारखंड या राज्यातील वातावरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे . आजपासुन रेमन चक्रिवादळ अधिक तिव्र होण्याची संभावना असणार आहे .

या चक्रिवादळाचा प्रति तास 120 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे . या चक्रिवादळाचा परिणाम म्हणून पश्चिम बंगाल व उडीसा राज्यात अतिवृष्टी होण्याची मोठी संभावना आहे . या चक्रिवादळाचा महाराष्ट्र राज्यात भारसा फरक पडणार नाही , परंतु उडीसा / छत्तीसगड लगतच्या जिल्ह्यांना सदर चक्रिवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे .

यांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची मोठी शक्यता आहे . तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाण पाऊस तर ढगाळ वातारण राहण्याची शक्यता आहे . या चक्रिवादळाचा परिणाम हा पुढील 48 तास म्हणजेच 27 तारखेपर्यंत असणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला आहे .

तर चक्रिवादळ ज्या भागांमध्ये अधिक जोर धरेल , अशा ठिकाणी शासकीय यंत्रणा नागरिकांच्या मदत कार्यांसाठी सज्ज झाले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *