Live marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ State employee October to December Month Payment GR ] : कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर महिन्याचे उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित वेतनाकरीता निधींचे वितरण करणे बाबत राज्य शासनांकडून दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
समग्र शिक्षा अभियान अतंर्गत शिक्षक शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी राज्य शासनांचा हिस्सा या लेखाशिर्ष 2202 अंतर्गत वेतन उद्दिष्टाखाली सन 2023-24 करीता अर्थसंकल्पीत करण्यात आलेली रक्कम पैकी माहे सप्टेंबर 2023 चे उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित ..
तसेच दिपावली सण अग्रिम अदा करण्या करीता एकुण रुपये 14,00,84,400/- रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .तसेच सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि शिक्षक आणि इतर सेवा समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण या लेखाशिर्षाखालील मंजुर तरतुदीतून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच वित्त विभागांकडून दिनांक 06 मे 2022 रोजीच्या पत्रानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार सदर नमुद अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च सुरुवातीला राज्य हिश्याच्या लेखशिर्ष अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टांतर्गत तरतुदीमधून अदा करण्यात येणार आहेत . तसेच सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनाखाली होणाऱ्या कपातीच्या नोंदी जसे GPF , GIS , INCOME TAX इ. राज्यातील HRMS / IFMIS सेवार्थ प्रणाली मध्ये ठेवण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.