Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Relaxation of upper age limit for appointment to Government Service, GR issued in respect ] : शासन सेवेमध्ये सरळसेवेने नियुक्ती करिता कमाल वयोमर्यादेत शिथीलता देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की , महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC) मार्फत दिनांक 01 जानेवारी 2024 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरती करिता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही. अशा जाहिराती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार , विहित केलेली कमाल वयोमर्यादा 01 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे .
याशिवाय ज्या पदांसाठी संबंधित पदांचा सेवाप्रवेश निर्माण विवक्षित कारणास्तव दिनांक 25 एप्रिल 2016 मध्ये विहित केलेली कमाल वयोमर्यादा पेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केले आहे , अशा पदांसाठी विविध केलेली कमाल वयोमर्यादेत देखील सदर 01 वर्ष इतकी शिथीलता देय राहील असे नमूद करण्यात आले आहेत .
यामुळे जे उमेदवार अशा जाहिराती करिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत , त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 01 वेळची विशेष बाब म्हणून , अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता ..
