राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहीण्याबाबतचे वेळापत्रक ; जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding writing confidential reports of state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनिय  अहवाल लिहीण्याबातचे वेळापत्रक संदर्भात सदर लेखामध्ये सविस्तर माहिती घेवूयात ..

स्वयंमुल्यनिर्धारण अहवाल : स्वयंमुल्यनिर्धारण अहवालासह परिशिष्ट ब मधील गोपनिय अहवालाचे कोरे फॉर्म सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करण्याचे निर्देश आहेत . तर स्वयंमुल्यनिर्धारण अहवालासह गोपनीय अहवाल प्रतिवेदन अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा कालावधी हा दिनांक 31 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत असेल .

तर प्रतिवेदन अधिकारी यांनी परिशिष्ट ब भाग – 4 लिहून पुनर्विलोकन अधिकाऱ्यांना सादर करण्याचा कालावधी हा दि.30 एप्रिल पर्यंत असणार आहे . तर पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी परिशिष्ट ब भाग 5 पुर्ण करुन अहवाल संस्करण अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा कालावधी हा 15 मे पर्यंत असणार आहे .

तर संस्करण अधिकाऱ्याने सर्व गोपनिय अहवालांचे संस्करण करुन अशा गोपनिय अहवालाच्या झेरॉक्स प्रती सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना देवून त्याची पोच घेण्यासाठी दि.30 जुन पर्यंत कालावधी नमुद आहे .

तर गोपनिय अभिलेख विरुद्ध अभिवेदन करण्यासाठी , गोपनिय अभिलेखाची झेरॉक्य प्रत मिळाल्यापासून एक महिन्यांत सादर करायचा आहे . त्यानंतर अभिवेदनावर प्रतिवेदन / पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचे अभिप्राय प्राप्त करुन शेरे काढणे / न काढणे याचा निर्णय घेण्याची कार्यवाही करीता अभिवेदन प्राप्त झाल्यापासून 3 महिन्यांत करता येईल ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment