Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ration card grain rule change from 01 November ] : सरकार मार्फत मिळणारे स्वस्त धान्यांच्या नियमांमध्ये मोठा बदलाव दिनांक 01 नोव्हेंबर 2024 पासुन करण्यात आलेला आहे . सदर नियमांनुसार , आता मिळणारे धान्य कमी होणार आहेत . नेमकी नविन तरतुद काय आहे ? याबाबत सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सदरच्या नियमावली नुसार आता तांदुळ तसेच गव्हाच्या धान्य कमी प्रमाणात लाभार्थ्यांना मिळणार आहे . सरकारकडून गोर गरीब जनतेला स्वस्त भावात तांदुळ , तेल , साखर , गहू अशा प्रकारचे अन्नधान्य दिले जाते , त्यातुन देशातील गोर गरीब जनतेचा उदर्निवाह चालतो . तर कोरोना काळांमध्ये सरकारकडून अतिरिक्त धान्य वाटपाला मंजूरी देण्यात आलेली होती , आता सदर धान्य वाटपांमध्ये बदलाव करण्यात आलेले आहेत .

आता सुधारित नियमानुसार म्हणजेच दि.01 नोव्हेंबर 2024 पासुन रेशन कार्डधारकांना तांदु व गहु हे समान वाटप करण्यात येणार आहेत . तर यानुसार आता रेशन कार्ड धारकांना तांदळाच्या वाटपांमध्ये घट होणार आहे , यापुर्वी सरकारकडून 3 किलो तांदुळ तर 02 किलो गहु याप्रमाणे दिले जाते होते . तर आता नविन नियमानुसार गहु व तांदुळ हे सम-समान वाटप करण्यात येणार आहेत . .

यानुसार आता 2.5 किलो गहु तर 2.5 किलो तांदुळाचे वाटप करण्यात येणार आहेत , यानुसार आता तांदळाच्या धान्यात घट करण्यात आलेली आहे . तर गव्हाच्या वाटपात 500 ग्रॅमची वाढ करण्यात आली आहे .

तर यापुर्वी अंत्योदय कार्डधारकांना 14 किलो गहु तर 30 किलो तांदुळ वाटप करण्यात येत होते , आता सुधारित नियमानुसार 18 किलो तांदुळ तर 17 किलो गहु वाटप करण्यात येणार आहेत , सदरचे सुधारित नियम हे दि.01 नोव्हेंबर 2024 पासुन लागु करण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *