Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ration card EYC date ] : रेशन कार्ड ई-केवायसीची मुदत दिनांक 31 ऑक्टोंबर पर्यंत देण्यात आलेली आहे , त्यानंतर 01 नोव्हेंबर नंतर ई-केवायसी पुर्ण न झालेल्यांना धान्य मिळणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
आता यापुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत स्वस्त धान्य मिळविण्याकरीता रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी पुर्ण करणे बंधनकारक असणार आहे . अद्याप बऱ्याच शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पुर्ण केलेली नाही , अशांनी दिनांक 31 ऑक्टोंबर पर्यंत पुर्ण करुन घेण्याची अंतिम मुदत असणार आहे .
E-KYC पुर्ण करण्याची प्रक्रिया : ई-केवायसी पुर्ण करण्याची प्रक्रिया ही आता पुर्णपणे ऑनलाईन माध्यमातुन करण्यात आलेली असून , स्वस्त धान्य दुकानात जावून त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रांमध्ये आधार क्रमांक सिडींग करुन घ्यायचा आहे , त्यानंतर आपली ई- केवायसी पुर्ण् होईल . सदरची प्रक्रिया निशुल्क असणार आहे .
ई-केवायसीचा उद्देश : काही नागरिक स्थलांतरीत आहेत , त्यांना आता तेथील जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जावून सदर ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करता येवू शकणार आहे . सदर ई-केवायसी मुळे धान्य वितरण करण्यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा मुख्य उद्देश आहे .
दि.01 नोव्हेंबर नंतर धान्य बंद होण्याची शक्यता : ज्या नागरिकांनी सदर ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण केलेली नाही , अशांचे धान्य दि.01 नोव्हेंबर नंतर बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .