Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ram Mandir , Public Holiday ] : अयोध्यामध्ये दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदीराचे प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त संपुर्ण देशभरात अर्धा दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . या संदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत्त कार्यालय ज्ञापन निर्गमित करण्यात आलेले आहेत .

दिनांक 22 जानेवारी रोजीची वाट देशातील सर्व नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत , या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहेत . जे लोक सदर प्राणप्रतिष्ठा निमित्त अयोध्यामध्ये पोहोचू शकणार नाहीत , अशांना थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता सुट्टी मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारकडून संपुर्ण देशभरामध्ये अर्धा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार , देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुपारुन अर्धा दिवस सुट्टी असेल , तसेच या दिवशी शाळा – महाविद्यालये देखिल अर्धा दिवसच सुरु असतील . तसेच संपुर्ण देश भरातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये , केंद्रीय संस्था तसेच केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठाण मध्ये दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी अर्धा दिवस शासकीय सुट्टी असणार आहे .

या अर्धा दिवसांमध्ये देशातील सर्व जनतेस राम मंदीर उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहेत , या दिवशी देशांमध्ये दिवाळी सारखा उत्सव साजरा करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींकडून करण्यात आलेले आहेत . या दिवशी घरोघरी पणत्या व गोर गरीबांना भोजन देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *