Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rajya vetan truti nivaran samiti 2024 prastav ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण समिती 2024 प्रस्तवा बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
7 व्या वेतन आयोगातील वेतनत्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे . सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनास सादर करावयाचा आहे ,या करीता सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयाकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या ..
सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी निवारणाबाबतचे प्रस्ताव प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्र.03 व 04 मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करुन सादर करण्यास नमूद केले आहे . या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक 16 मे 2024 पुर्वी सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्र.02 येथील दिनांक 09 मे 2024 रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आले होते . तथापि निवडणूकीच्या कामकाजासाठी विभागातील अधिकारी / कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्याने , दिनांक 15 मे 2024 रोजीच्या पत्रानुसार दिनांक 34 मे 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याबाबत विभागांना कळविण्यात आले होते .
तर अद्याप पर्यंक काहीच मंत्रालयीन विभागांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत , आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे कामकाज व विधानमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा विचार करुन वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दिनांक 10 जुन 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .
याकरीता सर्व विभागांना कळविण्यात आले आहेत कि , विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल शासन निर्णय दिनांक 28 मार्च 2024 मधील परिच्छेद क्र.03 व 04 येथील नमुद तरतुदींप्रमाणे कार्यवाही करुन दिनांक 10 जुन 2024 पुर्वी वित्त विभाग / सेवा – 9 कार्यासनाकडे ( वेतनत्रुटी निवारण समितीकडे ) अभिप्रायासह सादर करण्याची विनंती करण्यात आलेली आहे .
सदर परिपत्रकांमध्ये वेतन त्रुटीनिवारण समितीच्या सुनावणीचे वेळापत्रक देखिल निर्गमित करण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.