रजा रोखीकरण संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ raja rokhikaran high court result ] : रजा रोखीकरण संदर्भात उच्च न्यायालयांकडून अत्यंत महत्वपुर्ण निकाल देण्यात आला आहे , यामुळे याचिका कर्मचाऱ्यांस मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे . याबाबत कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 6 टक्के व्याजाने सदर रजा रोखीकरण लाभ देणेबाबत उच्च न्यायालयांकडून सदर आस्थापना कार्यालयांस सुचित करण्यात आलेले आहेत .

कर्मचाऱ्यांने सेवा कालावधीमध्ये जमावलेल्या रजेचे आर्थिक लाभ सेवानिवृत्तीनंतर रजा रोखिकरण या बाबीखाली कर्मचाऱ्यांस दिले जाते . रजा रोखीकरण हे एक प्रकारचे वेतनासारखेच असून , सदर लाभ कर्मचाऱ्यांस न देणे हे घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवणे असे आहे . याबाबत विदर्भ – कोकण ग्रामीण बँकेचे कर्मचारी श्री.दत्ताराम सावंत व सीमा सावंत यांनी रजा रोखीकरणाचा लाभ मिळावा याकरीता उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केली होती , सदर याचिकेवर उच्च न्यायालयांकडून सुनावणी देण्यात आली .

यांमध्ये उच्च न्यायालयाने निकाल देत – म्हणाले कि , कर्मचाऱ्यांस रजा रोखीकरणांपासून वंचित ठेवणे हा एक प्रकारचे अघटनात्मक बाब असून , सदर कर्मचाऱ्यांस रजा रोखीकरणांचे लाभ हे पुर्वलक्षी प्रभावाने 6 टक्के व्याजांसह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे .

वरीलपैकी दोघांनी एकुण 30 वर्षांची सेवा पुर्ण केल्यानंतर दत्ताराम सावंत यांच्या खाती 250 विशेषाधिकार रजा जमा होती , सदर 250 दिवसांचे रजा रोखिकरण लाभ हे 6,57,454 /- रुपये इतकी रक्कम मिळणे अपेक्षित होते . तर सीमा सावंत यांच्या खाती 210 रजा शिल्लक होत्या त्यांना 4,66,830/- रुपये आर्थिक लाभ मिळणे अपेक्षित होते .

परंतु बँकेमार्फत सदर कर्मचाऱ्यांस रजा रोखीकरणाचे लाभ अदा करण्यास मनाई केल्यास सदर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयांमध्ये 8 टक्के व्याजांसह लाभ अदा करण्याची मागणी केली असता , उच्च न्यायालयांकडून सदर लाभ 6 टक्के व्याजांसह अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment