राज्यामध्ये “या” तारखेपर्यंत असणार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update till this date] : राज्यामध्ये कालपासून काही भागात किरकोळ ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे . सदर पावस राज्यामध्ये दिनांक 29 डिसेंबर 2024  पर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे .

कालपासून राज्यातील विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . तर पुढे दिनांक 29 डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यामध्ये दिनांक 29 डिसेंबर पर्यंत राज्यातील लातूर ,नांदेड, परभणी, यवतमाळ, अकोला, हिंगोली , वाशिम , अमरावती, जळगाव , नंदुरबार , धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर , धाराशिव, बीड, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

तर यापैकी जळगाव , नंदुरबार ,नाशिक ,छत्रपती संभाजीनगर , बीड, अकोला ,अमरावती ,बुलढाणा, वाशिम, परभणी, जालना पुणे ,अहमदनगर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटसह पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत , तर सदरचा पाऊस आणखीन वाढणार असल्याने , रब्बी हंगामातील पिकावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

Leave a Comment