Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update next 24 hours ] : सध्या परतीच्या पावसाचा मुक्काम राज्यामध्ये वाढला असून , पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे . तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , काही भागांमध्ये ढगफुटी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

पुढील 24 तासांमध्ये राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . यामध्ये पुण्यात ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर पुढील 24 तासांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी , चंदनगड , राधानगरी , पन्हाळा या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे . तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , करमाळा , सांगोला , माहूर , माढा या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर नाशिक , अहमदनगर ,पुणे ,सांगली ,सातारा ,नंदुरबार कोकण किनारपट्टी या भागामध्ये मोठ्या पुढील 24 तासात मोठया प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीचा इशारा देण्यात आलेला आहे .

तर 18 ऑक्टोबर रोजी राज्यात अमरावती , छत्रपती संभाजीनगर , अकोला , नाशिक , जळगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . दिनांक 21 ऑक्टोबर नंतर मान्सून राज्यातून निघून जाईल , त्यानंतर पावसाचे प्रमाण राज्यात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *