Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update news for next four days ] : राज्यांमध्ये दिनांक 08 जुलै पासुन कोकण विभागातील जिल्हे , पुणे , सातारा , कोल्हापुर या भागांमध्ये अतिवृष्टीस सुरुवात झाली होती ,सदर जिल्ह्यांमध्ये दिनांक 09 जुलै पर्यंत अतिवृष्टी कायम होती , यामुळे प्रशासनांकडून सर्व शाळा / महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश जारी करण्यात आले होते .

पुढील 4 दिवस राज्यात असा राहील पाऊसमान : आजच्या दिवशी राज्यांमध्ये कोकण , विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा , पुणे तर मराठवाडा विभागातील छ.संभाजीनगर , जालना , नांदेड , परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे .

उद्यासाठी हवामान अंदाज : उद्या दिनांक 11 जुलै रोजी राज्यांमध्ये पावसाचा अधिक जोर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , राज्यांमध्ये मध्य महाराष्ट्रातील कोकण व घाटमाथा इ. भागांमध्ये पावसाला अधिक जोर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

12 जुलै रोजी पावसाचा अंदाज : दिनांक 12 जुलै वार गुरुवार रोजी राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , परंतु  राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा या या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .

13 जुलै रोजी पावसाचा अंदाज : दिनांक 13 जुलै वार शनिवार रोजी मध्य महाराष्ट्र , विदर्भ त्याचबरोबर कोकणांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *