पुढील 3 दिवस “या” 16 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी शक्यता ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update news for next 3 days ] : राज्यांमध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे . सदर अंदाजानुसार , राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी शक्यता आहे .

बंगाच्या उपसागर मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झल्याने , राज्यात दिनांक 26 ते 28 डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .सदरचा पाऊस हा किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा राहणार आहे . परंतु पिकांवर हानीकारक ठरु शकतो , असे कृषीतज्ञांने मत व्यक्त केला आहे .

दि.26 डिसेंबर रोजीचा अंदाज : दिनांक 26 डिसेंबर रोजी म्हणजेच आज रोजी राज्यातील नाशिक , जळगाव , छ.संभाजीनगर , नंदुरबार , धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .

दि.27 डिसेंबर रोजीचा अंदाज : दिनांक 27 डिसेंबर रोजी राज्यात बीड , जालना , परभणी , अकोला , बुलढाणा , अमरावती , वाशिम , वर्धा छ.संभाजीनगर , पुणे , अहमदनगर , नाशिक , जळगाव , नंदुरबार , धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .

दि.28 डिसेंबर रोजीचा अंदाज : दिनांक 28 डिसेंबर रोजी राज्यात बीड , जालना , छ.संभाजीनगर , अहमदनगर , नाशिक , जळगाव अमरावती , नागपुर , गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .

Leave a Comment