Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update for next 48 hors ] : मकर संक्रांतीच्या सणानंतर सुर्य हा मकर राशीत प्रवेश करतो , ज्यामुळे थंडीचा कडाका हळूहळू कमी होत असतो . परंतु सध्या अरबी समुद्रात चक्राकार वारे तयार झालेले आहेत .
याचा परिणाम म्हणून राज्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे . सध्यस्थितीत राज्यात थंडीचा कडाका बराच कमी झालेला आहे , तर तापमानात काहीशी वाढ दिसून येत आहे .
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे . याचा परिणाम म्हणून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहेत . तर पुढील 2 दिवसांमध्ये राज्यात किमान तापमानात वाढ होणार असून , ढगाळ वातावरणाची निर्मिती होवून गारठा बराच कमी होण्याची शक्यता आहे .
किमान तापमानात वाढ होणार असल्याने , राज्यात उत्तर कोकण व मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . सदरचा पाऊस हा अवकाळी स्वरुपाचा असला तरी , किरकोळ ठिकाणीच पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
पंरतु राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .