Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update for next 2 days ] : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 02 दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सदरच्या अंदाजानुसार वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

पुढील 02 दिवस अलर्ट जारी : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हिमाचल व काश्मीर मध्ये बर्फवृष्टी होत आहे , यामुळे उत्तराखंड राज्यात कालपासुन पाऊस सुरु झाला आहे . याशिवाय छत्तीसगड , पंजाब , हरियाणा , बिहार , उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये धुक्के मोठ्या प्रमाणात पडत आहेल , या भागात पावसाचा काल पासुन ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

तर कर्नाटक मध्ये बेंगळूर येथे तापमान 16 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून म्हैसून शहराचे तापमान 15 अंश सेल्सिअस इतके आहे , याशिवाय कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांचे तापमान हे 27 ते 30  अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचले आहे . यामुळे या भागात कालपासुन पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कर्नाटक राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तसेच उत्तरेकडे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून , महाराष्ट्र राज्यात मुंबई , ठाणे , पालघर , रत्नागिरी , कोल्हापुर , सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्याच्या भागात किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *