Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update dated 28 July to 31 July 2024 ] : दिनांक 28 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे . सदर कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस पडेल याबाबतचा हवामान अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..
आज दिनांक 28 जुलै ते दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत राज्यामध्ये मराठवाडा विभागातील संपूर्ण जिल्हे तसेच सोलापूर ,कोल्हापूर, सातारा ,सांगली, पुणे ,अहमदनगर ,नाशिक या 15 जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता थोड्या प्रमाणात कमी होऊन मध्यम प्रकारच्या पावसाची शक्यता सदर जिल्ह्यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे . मात्र दिनांक 01 ऑगस्ट 2024 पासून सोलापूर, कोल्हापूर ,सातारा, सांगली ,पुणे ,अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दिनांक 3 ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ,हिंगोली ,जालना या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम असणार आहे . तर विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांसह नंदुरबार ,धुळे, जळगाव अशा एकूण 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून दिनांक 03 ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असणार असल्याचे शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे .
हे पण वाचा : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये तब्बल 200 जागेसाठी मोठी पदभरती , लगे करा आवेदन !
त्याचबरोबर कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता कायम असणार आहे . मराठवाड्यामध्ये मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी व इतर लहान धरणातील पाणीसाठामध्ये मोठी वाढ झाली आहे . यंदाच्या वर्षी मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतीसाठी चांगला दिलासा मिळाला आहे .
आज दिनांक 28 जुलै रोजी राज्यातील ठाणे ,मुंबई ,पालघर, रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग त्याचबरोबर सातारा ,कोल्हापूर पुणे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे , तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !