Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधाी [ punyashlok ahilyadevi Holkar mahila stratup yojana ] : राज्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मान्यता देणेबाबत राज्य शासनांच्या कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विकास विभागांकडून दिनांक 09 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्संना प्रारंभिक टप्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे . या योजनेची उद्दिष्ट व स्वरुप तसेच लाभार्थी पात्रता व लाभार्थ्यांची निवड या बाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

योजनेची उद्दिष्ट व स्वरुप : राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्संना पाठबळ देणे , तसेच महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविण्यपुर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करणे , महिलांना स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे , तसेच राज्याची ओळख निर्माण करणे तसेच रोजगार निर्मिती करुन बेरोजगारी कमी करणे , तसेच किमान 1 लाख ते कमाल 25 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहेत .

लाभार्थी पात्रता : या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स  लाभास पात्र राहील .

2. तसेच सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक / सह संस्थापक यांचा किमान 51 टक्के वाटा असणे आवश्यक आहे  .

3. तसेच महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 01 वर्षांपासून असणे आवश्यक असेल , तसेच सदर स्टार्टअपची वार्षिक उलाढाल ही किमान 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपये इतकी असणे आवश्यक असेल .

4.महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनांच्या इतर कोणत्याही योजनांमधून अनुदान स्वरुपातील आर्थिक लाभ घेतले नसावेत ..  

अर्ज प्रक्रिया : या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी राज्य शासनांच्या www.msins.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करता येईल .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *