Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ havaman andaj panjabrao dakh] : सध्या राज्यामध्ये रेमल चक्रीवादळाचा थैमान सुरू आहे . विदर्भ , मराठवाडा मधील जिल्ह्यात कालपासून चक्रीवादळ अधिक सक्रिय झालेला आहे , तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे . अशातच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिनांक 01 जून ते 05 जून दरम्यान राज्यातील या जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार सुरुवात होणार असल्याचे अंदाज व्यक्त केला आहे .
दिनांक 22 मे रोजी अंदमानमध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे ,तर महाराष्ट्रामध्ये दिनांक 10 जून दरम्यान मान्सूनचे सुरुवात होणार आहे , सध्या बंगालच्या उपसागरामध्ये रेमल चक्रीवादळ तयार झाले असल्याने , दिनांक 31 मे पर्यंत चक्रीवादळाचा प्रादुर्भाव असणार असल्याचे शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . दरम्यानच्या कालावधीमध्ये पाऊस कमी आणि चक्रीवादळ (वादळी वारे ) अधिक असणार आहे , यामध्ये नुकसानीची शक्यता मोठी असेल .
दिनांक 01 जून ते पाच जून या कालावधीमध्ये राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हमामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे . या कालावधीमध्ये राज्यातील उत्तर महाराष्ट्र , कोकण , मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये जोरदार मुसळधार पावसाची दाट शक्यता असणार आहे .
या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस : तर राज्यातील जळगाव , धुळे ,यवतमाळ ,जालना, नाशिक ,नांदेड, अहमदनगर, हिंगोली ,छत्रपती संभाजी नगर ,परभणी ,बीड, लातूर, धाराशिव ,सोलापूर, कोल्हापूर ,सातारा ,सांगली या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे . तर दिनांक 6 जून ते नऊ जून दरम्यान विदर्भामध्ये पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे .
जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये पावसाची मोठी शक्यता : यंदाच्या वर्षी माहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस अधिक जोर धरणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे .
आपण जर शेतकरी असाल तर नवनवीन माहिती करिता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.