राज्यांमध्ये दिनांक 22 जुन ते 30 जुन पर्यंत पावसाचा जोर अधिकच वाढणार – जाणून घ्या पंजाबराव यांचा सुधारित अंदाज ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh new havaman andaj ] : राज्यांमध्ये दिनांक 22 जुन ते 30 जुन पर्यंत पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा नवा सुधारित हवामान अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे . सुधारित हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

मान्सुन यंदा बऱ्याच वेळा निष्क्रीय ठरला होता , तर आता पुन्हा एकदा मान्सुन राज्यांमध्ये दमदार पणे सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . राज्यांमध्ये विदर्भ / मराठवाडा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे , परंतु पेरणीनंतर पावसाने चक्क सुट्टीवर गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत होते , तर मान्सुनच्या पुन्हा आगमनाने शेतकऱ्यांच्या मनांमध्ये नव चैतन्य दिसून येणार आहे .

दिनांक 22 जुन ते 25 जुन पर्यंत पावसाला सुरुवात : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या सुधारित अंदाजानुसार दिनांक 22 जुन पासून भाग बदलत पावसाची शक्यता असणार असल्याचे सांगण्यात आले आहेत . तर राज्यांमध्ये दिनांक 23 जुन ते दिनांक 25 जुन या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी परंतु जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे . परंतु राज्यात सर्व भागांमध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे .

26 जुन पासून राज्यात सर्वदुर पडणार पाऊस : राज्यांमध्ये दिनांक 26 जुन पासुन सर्व दुर पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , दिनांक 26 जुन ते दिनांक 30 जुन या कालावधीमध्ये राज्यांमध्ये सर्व दुर मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबरावांनी व्यक्ती केली आहे . या पावसाने नदी , नाले , छोटे – मोठे पाण्याचे तळे भरुन वाहतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे .

जुलै महिन्यातील अंदाज : पुढील माहे जुलै महिन्यात दिनांक 10 जुलै ते 15 जुलै या दरम्यनच्या काळांमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर दिनांक 19 जुलै व 20 जुलै रोजी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल , तर दिनांक 25 जुलै व 26 जुलै रोजी पुन्हा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .

Leave a Comment