Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh havaman andaj & instraction for farmer ] : पंजाबराव डख यांचा पुढील महिन्यांपर्यंतचा हवामान अंदाज व शेतकऱ्यांना महत्वपुर्ण संकेत देण्यात आले आहेत . राज्यांमध्ये अनेकजन पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार शेतांमध्ये पेरणी , काढणी करतात . यामुळे शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे .

राज्यांमध्ये दिनांक 25 जुन पासुन जोराच्या पावसाला सुरुवात होत आहे , तर दिनांक 27 जुन ते 30 जुन पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे . राज्यांमध्ये विदर्भ व मराठवाडा विभागांमध्ये दिनांक 27 जुन ते 30 जुन या कालावधीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , तर पश्चिम महाराष्ट्रांमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडेल , तर कोकणांमध्ये मुंबई , पालघर , ठाणे , रायगड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

म्हणजेच राज्यांमध्ये दिनांक 23 जुन पाऊसाला सुरुवात झाली असून , दिनांक 27 जुन पासुन मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे . 27 जुन ते 30 जुन पर्यंत राज्यात सर्वाधिक पाऊस असेल , त्यानंतर पाऊस उजाडा देईल . उजाडा दिल्यानंतर ज्या भागांमध्ये पेरणी झाली नसेल , अशांनी पेरणी करुन घेण्याचा सल्ला पंजाबरावांनी दिला आहे . कारण पुढील महिन्यांमध्ये देखिल मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे .

तर ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे , अशा ठिकाणी या पावसाने पिकांच्या वाढीचा मोठा दिलासा मिळणार आहे . पुढील महिन्यांमध्ये दिनांक 11 जुलै ते 13 जुलै पर्यंत जोराचा पाऊस असेल तसेच दिनांक 19 ते 23 जुलै पर्यंत राज्यांमध्ये जोराचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

जुलै महिन्यांमध्ये भाग बदलुन पाऊस पडणार असल्याने , शिवाय 10 जुलैपासुन राज्यात ढगाळ वातावरणांस सुरुवात होईल , काही ठिकाणी रिमझीम पावसाला सुरुवात होईल , यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत होत राहील . यामुळे शेतकऱ्यांनी दिनांक 27 ते 30 जुन काळातील पावसानंतर उर्वरित असणारी पेरणी करुनच घ्यावीत , असा सल्ला पंजाबरावांनी दिलेला आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *