Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh havaman andaj from 12 aug to 02 september ] : राज्यात दिनांक 12 ऑगस्ट ते दिनांक 02 सप्टेंबर 2024 पर्यंतचा नवा हवामान अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे . यानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांचा सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
हवामान तज्ञ पंजाबरावांनी दिलेल्या अंदाजानुसार , दिनांक 12 ऑगस्ट पासुन ते दिनांक 19 ऑगस्ट पर्यंत राज्यात कडक ऊन असणार आहे . त्यानंतर मात्र राज्यातील वातावरण बदलत जाईल , सदर कालावधीतील ऊन हे पिकांस पोषक ठरणार आहेत . पिकांच्या फळ वाढीस सहाय्यभूत ठरणार आहेत .
यांमध्ये नांदेड , लातुर , बीड, जालना , सोलापुर , धाराशिव , सांगली , सातारा , नगर , नाशिक , हिंगोली , यवतमाळ , चंद्रपुर , वाशिम , परभणी , छ.संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कडक ऊन पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , यामुळे या भागांमध्ये डाळिंब पिकास अधिक पोषक ठरणार आहेत . सततच्या पावसाने डाळिंबावर रोगांचे सावट लागल्याने , हे ऊन अधिक फायदेशिर ठरेल , तसेच मुग काढण्यासाठी हार्वेस्टिंग साठी कोरडे हवामान अधिक फायदेशिर ठरणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात तब्बल 5000+ जागेसाठी महाभरती ..
दिनांक 19 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडे असले तरी राज्यातील रायगड , पालघर , ठाणे , , सिंधुदुर्ग , रत्नागिरी या समुद्र किनारी जिल्ह्यात दिनांक 17 पर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच धुळे , जळगाव , अकोला , बुलढाणा , वर्धा , नागपुर या जिल्ह्यात देखिल पावसाच्या हलक्या सरी बरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
तर दिनांक 19 ऑगस्ट नंतर मात्र हवामानांमध्ये बदल होवून दिनांक 20 ऑगस्ट ते दिनांक 02 सप्टेंबर 2024 या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये 02 लो प्रेशर तयार होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . या प्रेशर मुळे कर्नाटक व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . म्हणजेच दिनांक 20 ऑगस्ट ते दिनांक 02 सप्टेंबर पर्यंत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे .