हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्याचा नविन हवामान अंदाज ; असा असणार पाऊसमान , जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao Dakh havaman andaj ] : हवामन तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून माहे ऑगस्ट महिन्याचा नविन हवामान अंदाज देण्यात आला आहे , या अंदाजानुसार किती तारखेपर्यंत पाऊस पडेल ? , कोणत्या भागात पाऊस अधिक पडेल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

राज्यांमध्ये मागील आठवड्यात राज्यात अतिजोरदार पाऊस पडला आहे , काही भागांमध्ये ( कोकण ) अतिवृष्टी झाल्याने पुरस्थिती निर्माण झालेली आहे . परंतु सध्यस्थितीमध्ये पावसाचा जोर काहिसा कमी झालेला आहे . या पावसाने राज्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे , तसेच कोल्हापुर , पुणे , सातारा , चंद्रपुर या भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाल्याने , सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहेत .

पंजाबराव यांनी दिलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आजपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तसेच सदर पावसाचा जोर हा पुढील महिन्या पर्यंत कायम असणार असल्याचाी शक्यता वर्ततवण्यात आली आहे . राज्यात दिनांक 05 ऑगस्ट पर्यंत सध्यस्थितीमध्ये असणारा पावसाचा जोर कायम असले , या कालावधीत राज्यांमध्ये विविध भागांमध्ये पाऊस पडेल .

परंतु पावसाचे भाग बदलत जाणार आहेत , तर काही भागांमध्ये रिमझिम प्रकारचा पाऊस पडणार आहे , तर काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे .

तर राज्यांमध्ये कोकण , उत्तर महाराष्ट्र , पश्चिम विदर्भ , पुर्व विदर्भ या भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . ऑगस्ट महीन्यात राज्यातील जायकवाडी , येलदरी या सारखे धरण 100 टक्के क्षमतेने भरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात जळगाव , धुळे , नंदुरबार , संपुर्ण विदर्भातील जिल्हे असे एकुण 14 जिल्ह्यांमध्ये दिनांक 03 ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार अशा प्रकारच्या पावसाची शक्यता आहे .

तसेच कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिनांक 03 ऑगस्ट पर्यंत अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . तर संपुर्ण राज्यात दिनांक 31 जुलै पर्यंत खानदेश वगळता मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर राज्यांमध्ये दिनांक 01 ऑगस्ट पासुन राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , तर राज्यातील मराठवाडा विभागातील सर्वच 08 जिल्ह्यांमध्ये दिनांक 03 ऑगस्ट पर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment