Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh havaman andaj date 18 jun to 30 jun ] : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकतेच दिनांक 18 जुन ते 30 जुन पर्यंतचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ,या दरम्यानच्या काळांमध्ये कोणत्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
सदर कालावधीमध्ये राज्यात सर्वच भागांमध्ये पाऊस पडेल , परंतु पावसाचे प्रमाणे सर्वच ठिकाणी सारखे असणार नाही . म्हणजेच काही भागांमध्ये पाऊस पडेल , लगतच्याच भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल , म्हणजेच दिनांक 30 तारखेपर्यंत पावसाचे भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
दिनांक 18 जुन ते 23 जुन या कालावधीमध्ये राज्यातील बुलढाणा , छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड , नगर , परभणी , सोलापुर या जिल्ह्यांमध्ये 1-2 वेळा जोराचा मोठा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . हा पाऊस जोराचा पडणार असल्याने , याची शेतकऱ्यांनी विशेष नोंद घेण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच दिनांक 23 जुन नंतर राज्यांमध्ये मोठ्या पावसाची पोषक परिस्थिती तयार होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . तसेच दिनांक 24 जुन पासुन ते दिनांक 30 जुन पर्यंतच्या 5-6 दिवसांच्या काळांमध्ये राज्यांमध्ये खुपच मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
तर राज्यातील उत्तर महाराष्ट्रांमध्ये जळगाव वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही . तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिनांक 30 जुन पर्यंत रोज पावसाचे भाग हे बदलत जाणार आहेत , या दरम्यानच्या काळांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच मराठवाडा मधील जिल्ह्यांमध्ये देखिल 30 जुन पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .