Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ PunjabRao Dak new rain update ] : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे . सदर हवामान अंदाजानुसार दिनांक 16 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे , सविस्तर अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , दिनांक 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सातारा , कोल्हापूर , पुणे , कोकण विभाग, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
तर सदर कालावधीमध्ये विदर्भात ढगाळ वातावरण असणार आहे , परंतु पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही . तर दिनांक 17 नोव्हेंबर पासून विदर्भात कडक थंडीची लाट पसरणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे . उत्तर महाराष्ट्रामध्ये दिनांक 14 व 15 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ वातावरण असणार आहे तर पावसाळी शक्यता वर्तवण्यात आलेली नाही .
त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये दिनांक 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ वातावरण असणार आहे , तर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही . तर दिनांक 18 नोव्हेंबर पासून थंडीची लाट सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . एकंदरीत राज्यात दिनांक 18 नोव्हेंबर पासून थंडी वाढणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त करण्यात आला आहे .
म्हणजेच राज्यात पाऊस हळूहळू कमी झालेला असून , थंडीची लाट पसरत आहे . थंडीचे वातावरण काही पिकासाठी अधिक पोषक ठरतात .