Spread the love

Live Marathipepar , प्रणिता पवार संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Public Holiday ] : आगामी वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे . या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार तब्बल नऊ सार्वजनिक सुट्ट्या ह्या शनिवार , रविवारला जोडून येत आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीचा मोठा फायदा होणार आहे .

राज्य शासनांकडून सन 2024 मधील सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याच्या शासन राजपत्रानुसार विविध सण , उत्सव करीता एकुण 24 व एक अतिरिक्त अशा एकुण 25 सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेले आहेत . यापैकी तब्बल 9 सार्वजनिक सुट्ट्या ह्या शनिवार , रविवारला लागून येत आहेत . ज्यामुळे सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुट्टीचा मोठा फायदा होणार आहे .

यांमध्ये दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा शुक्रवारी येत असल्याने 26 ते 28 जानेवरी पर्यंत सुट्टी मिळणार आहे . तसेच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोमवारी येत असल्याने आधीचे 17 , 18 दिनांकापासून सलग सुट्टी मिळणार आहे . तसेच महाशिवरात्रीचा सण 8 मार्च शुक्रवार येत असल्याने , दि.08 मार्च , 09 मार्च व 10 मार्च अशी सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे .

तसेच गुड फ्रायडे 29 मार्च शुक्रवार येत आहे तसेच बकरी ईद सोमवार दिनांक 17 जुन रोजी येत आहे , तर दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजन ) शुक्रवार दिनांक 01 नोव्हेंबर रोजी येत आहेत तर गुरुनानक जयंती 15 नोव्हेंबर वार शुक्रवारी येत येत असल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवार , रविवार लगत सलग सुट्टीचा लाभ मिळणार आहे .

या संदर्भात राज्य शासनांकडून सुट्टीची यादी जाहीर केल्याचे शासन राजपत्र पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

सार्वजनिक सुट्टी यादी शासन राजपत्र

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *