Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ public holiday in October month] : माहे ऑक्टोबर मध्ये शासकीय कार्यालय , शाळा  ,महाविद्यालय यांना सर्वाधिक सुट्ट्या असणार आहेत , नेमके कोणकोणत्या सणासुदीसाठी सुट्टी असणार आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..

ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक सण उत्सव आल्याने , यंदाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक सुट्ट्या शाळा , महाविद्यालय , बँका , सरकारी कार्यालय यांना असणार आहे . यामध्ये प्रथम 01 ऑक्टोबर रोजी जम्मूमध्ये निवडणुका होत असल्याने , सदर सुट्टी केवळ जम्मू  करीताच लागू असणार आहे .

2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने सार्वजनिक सुट्टी असणार आहे . त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी नवरात्रीची सुरुवात असल्याने देशातील काही राज्यात शाळा , महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालय त्याचबरोबर बँका यांना सुट्टी राहणार आहे ,  सदरची सुट्टी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केली असेल तरच सुट्टी मिळेल . दिनांक 10 ऑक्टोबर रोजी महासप्तमी असल्याने ,  देशांमध्ये काही राज्यांमध्ये या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर असते .

12 ऑक्टोबर रोजी दसरा सण असल्याने या दिवशी देशातील सर्व बँका ,शाळा , महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालय यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर असते . त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी रविवार आल्याने सलग सुट्टी मिळणार आहे .

26 व 27 ऑक्टोबर : 26 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार असल्याने , बँका बंद राहतील . तर दि. 27 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असणार आहे , यामुळे सलग सुटीचा लाभ बँकिंग कर्मचाऱ्यांना मिळणार आहे .

त्यानंतर दिनांक 29 ऑक्टोबर , 30 ऑक्टोबर , 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्ताने सुट्टी मिळणार आहे . ऑक्टोबर मध्ये दिवाळी आल्याने , यंदाच्या वर्षी शाळा महाविद्यालयांना लवकरच सुट्टीचा लाभ मिळणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *