Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Coaching Classes Education News ] : आपले मुलं जर कोचिंगसाठी जात असतील तर आपणांसाठी ही खास बातमी असणार आहे . कारण यापुढे आता 16 वर्षांखालील मुलांना कोणतेही कोचिंग क्लासेस साठी प्रवेश घेता येणार नाहीत . यामागचे कारण देखिल सरकारने स्पष्ट केलेले आहेत .
मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी पालक आपल्या मुलांना खाजगी अनेक प्रकारचे शिकवणी लावतात . जेणेकरुन मुलं हे पुढे चालुन चांगल्या मार्गावर जातील . परंतु आता शिक्षण मंत्रालयांच्या मार्गदर्शक सुचना नुसार यापुढे वयाच्या 16 वर्षांखालील मुलांना शिकवणी लावता येणार नाहीत . केंद्र सरकारच्या या नविन सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार आता यापुढे 16 वर्षांखालील मुलांना शिकवणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही .
जर प्रवेश दिला तर पालक व कोचिंग देणारे सेंटर दोष असणार आहेत . जर या नियमांचे कोचिंग सेंटर मार्फत उल्लंघन झाल्यास , कोंचिंगची मान्यता रद्द केली जाणार आहेत . तर कोचिंग सेंटर मध्ये वयाच्या 16 वर्षानंतर मुलांना प्रवेश दिला पाहिजे , तर याकरीता पदवी पर्यंचे शिक्षण झालेल्या शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक असणार आहेत .
असा निर्णय का घेतला गेला : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून कोचिंग सेंटर बाबत घेण्यात आलेला हा निर्णय खरच आवश्यक होता का , असा प्रश्न सर्वांना पडत असेल परंतु याबाबत केंद्र सरकारने खासगी क्लासेसच्या फीसमध्ये झालेली मोठी वाढ , तसेच पसवी प्रलोभनं या गोष्टींचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलेले आहेत .
शिवाय लहान मुलांना आपले बालपण जगता यावेत याकरीता त्यांना फक्त शिक्षण न करता त्यांची आवडती रुची , कला व खेळ या गोष्टींमध्ये देखिल वेळ देता यावेत , जेणेकरुन मुलं हे सर्वगुणसंपन्न होईल . तसेच लहान पणीच ऐवढे शिक्षणाचे ओझे लादल्यास विद्यार्थी हा मानसिक टेन्शन मध्ये वागु नयेत याकरीता सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे . यामुळे अनेक पालकांच्या मते शिक्षण मंत्रालयाचा हा निर्णय योग्य असल्याचे बोलले जात आहेत .