Spread the love

Live Marathipepar प्रतिनिधी [ private anudanit school teacher recruitment ] : राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीसह शिक्षक पदभरती बाबत शिक्षण आयुक्तालयाकडून अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .

सदर परिपत्रक राज्यातील अध्यक्ष / सचिव संबंधित शैक्षणिक संस्था ( मुलाखतीसह पद भरतीचा विकल्प दिलेल्या सर्व संस्था ) यांच्या प्रति सादर करण्यात आला आहे , यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक 07 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या / खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित अंशत : अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील रात्र शाळांतील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 चे आयोजन दिनांक 22.02.2023 ते 03.03.2023 या कालावधीत करण्यात आले होते . सदर चाचणी परीक्षेत प्रविष्ठ होण्यासाठी दिनांक 12.02.2023 अखेर अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती .

हे पण वाचा : लिपिक , शिपाई पदांच्या 323 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

सदर चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे पवित्र पोर्टलवर दिनांक 30.09.2023 स्व- प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत . संच मान्यता सन 2022-23 नुसार मंजुर पदांच्या आधारे राज्यातील बिंदु नामावलीची तपासणी करण्यात आली आहे . शिक्षण सेवक / शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी संस्थेची जाहीरात , त्यातील आरक्षण , अध्यापनाचा गट विषय , शिकविण्याचे माध्यम उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम व उमेदवाराचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – 2022 मधील प्राप्त गुण या सर्वांचा एकत्रित विचार करुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे .

मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी 1 : 10 या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *