शाळेतुन विद्यार्थीनींना प्रिंसिपलने शर्ट काढून , घरी जायला सांगितले ; जाणून घ्या नेमके कृत्य ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Principal asks female students to take off their shirts and go home news ] : मुलींना शाळेतुन शर्ट काढून घरी जायला सांगल्याची घटना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे , परंतु या मागचे नेमके कृत्य कोणते आहे , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

झारखंड राज्यातील धनबाद येथील एका खासगी शाळेत 09 जानेवारी रोजी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचे सराव परीक्षा सुरु होत्या , परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पेन डे असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या शर्टवर वेगवेगळे मेसेज लिहीले होते . जे कि , मुख्याध्यापिका यांच्या मते विद्यार्थ्यांना अशोभनिय होते .

या प्रकरणी शाळेत तब्बल 100 विद्यार्थीनींना शर्ट काढून , पालकांना नविन शर्ट घेवूनच जाण्याची परवानगी देण्यात आली होती , यामुळे काही मुली शर्ट काढून केवळ ब्लेझरवरच घरी परतल्याने , पालक वर्ग अधिकच संतप्त होवून , स्थानिक आमदार यांच्याकडे मुख्याधिपिका सिस्टर एम देवश्री एसी यांच्याविरोधात तक्रार केली .

असे प्रकारचे कृत्य चुकीचे असून अत्यंत निंदनिय असून , याबाबत चौकशी करीता जिल्हाधिकारी माधवी मिश्रा यांच्याकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली असून , आवश्यकता भासल्यास सदर मुख्याधिपिका यांच्या विरोधात FRI देखिल नोंदविण्यात नोंदविण्यात येईल , अशी माहिती देण्यात देण्यात आली आहे .

Leave a Comment