Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Primary Student One State One Uniform GR ] : एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधिन शासन निर्णयानुसार , सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनांच्या मोर्फत गणेवश योजना अंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देणेबाबत , निर्णय घेण्यात आला आहे .

सदर निर्णमित शासन निर्णयामधील अनु क्र.02 मध्ये 2 ( अ ) समाविष्ट करण्यात येत आहेत . यांमध्ये राज्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या मुलींकरीता पिनो फ्रॉक  , इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी पर्यंतच्या मुलींकरीता शर्ट व स्कर्ट आणि इयत्ता 8 वी मधील मुलींकरीता सलवार – कमीज व ओढणी तसेच इयत्ता 1 ली व इयत्ता 7 वी पर्यंतच्या मुलांकरीता हाफ पँट व हाफ शर्ट व इयत्ता 8 वी मधील मुलांकरीता फुल पँट व हाफ शर्ट याप्रमाणे गणवेशाची रचना करण्यात यावेत . असे यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन शुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *