Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Government Vishwakarma Scheme ] : केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील कारागिरांना आर्थिक लाभ व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते , या योजना अंतर्गत ग्रामीण कारागीरांना प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणादरम्यान भत्ता व प्रशिक्षण साहित्य खरेदी करीता आर्थिक सहाय्यक करण्यात येते .

देशातील पारंपारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तब्बल 18 क्षेत्रातील कारागिरांना सदर विश्वकर्मा योजना अंतर्गत कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ह्या योजनेचे सुरुवात करण्यात आलेली आहे . यांमध्ये सुतारकाम , धोबी , पुष्प बनविणारे , न्हावी , खेळणी बनविणारे , बुरुडकाम , गवंडी , चांभार , शिल्पकार , कुंभार , सोनार , चाव्या बनविणारे , लोहार , हातोडी व हत्यारे बनविणारे ,चिलखतकार , नौकाबांधणीकार , शिंपी , मासेमारीसाठी लागणारे जाळे विणणारे विणकार या कारागीरांचा या योजना अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे .

या  योजना अंतर्गत पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येते , तसेच सदर कारागीरांना कौशल्य वृद्धी करीता 5-7 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण आणि 15 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचे प्रगत स्तराचे प्रशिक्षण दिले जाते , याकरीता त्यांना प्रतिदिन 500/- रुपये मानधनासह साहित्य भत्ता अदा करण्यात येतो . यांमध्ये प्राथमिक प्रशिक्षणाच्या सुरुवातीला साहित्य खरेदी करीता ई- वॉउचर्सच्या स्वरुपात रुपये 15,000/- इतका भत्ता देण्यात येते .

योजना अंतर्गत कर्जाची सुविधा : या योजना अंतर्गत सदर कारागिरांना आपले स्वत : चे व्यवसाय विकसित करणेकामी रुपये 3,00,000/- रुपये पर्यंत समर्थक मुक्त कर्ज , 100,000/- रुपये व 2,00,000/- रुपये अनुक्रमे 18 व 30 महीने कालावधीकरीता दोन टप्यांत मिळते , यांमध्ये कर्जावर व्याजाची सवलतीचा दर हा 5 टक्के निश्चित आहे तर , केंद्र सरकारकडून 8 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते .

यांमध्ये सदर प्राथमिक टप्याचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर 1,00,000/- रुपये पर्यंत लोन उपलब्ध होते , तर प्रगत स्तराचे प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर दुसऱ्या टप्यातील लोन घेता येईल . हे 3,00,000/- रुपये लोन असेल .

या योजना अंतर्गत लाभ कसा घ्याल : या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी विश्वकर्मा पोर्टलवर आधार – आधारित बायोमेट्रिक प्रणालीसह नाव नोंदणी करणे आवश्यक असेल . सदरचे नाव नोंदणी ही तीन स्तरीय पडताळणीद्वारे केली जाते , यांमध्ये 1) ग्रामपंचायत / शहरी स्थानिक संस्था 2 ) जिल्हा अंमलबजावणी समिती मार्फत 3 ) पडताळणी समितीच्या मान्यता यांचा समावेश असतो . या योजनाविषय अधिक माहिती तसेच आवेदन करणेकामी https://pmvishwakarma.gov.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावेत ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *