Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Solar Panel Scheme ] : देशाला आत्मनिर्भर बनविण्याकरीता तसेच वीजेच्या टंचाईपासून दुर करण्यासाठी देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनवमीच्या दिवशी प्रधानमंत्री सूर्योदय ही नविन योजनास सुरुवात केली आहे . या योजनाच्या माध्यमातुन भारताला आत्मनिर्भर बनविण्याचा केंद्र सरकारचा मोठा विचार आहे .
राममंदीराच्या प्राणप्रतिष्ठा नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोट्यावधी लोकांना सोरउर्जेची भेट देण्याची मोठी घोषणा करण्यात आली . या संदर्भातील अधिकृत माहिती पंतप्रधानांनी अयोध्याच्या दौऱ्याहून परतल्यानंतर प्रसार माध्यमांशी दिली . ह्या योजनातुन भारताला अधिक आत्मनिर्भर बनवेल , तसेच वीजेच्या टंचाई पासून संरक्षण मिळणार आहे .
या योजनांमधून देशातील कोट्यवधी घरांवर सोलार रुफटॉप ( Rooftop Solar Panel ) बसविण्यात येणार आहेत . या योजनांमुळे घरांमध्ये विजेची कोणत्याही प्रकारची टंचाई असणार नाही . तर मध्यम वर्गीय नागरिकांना वीजेच्या बिलांपासून कायमची मोठी सुटका होईल . आजच्या काळांमध्ये वीजेची होणारी मोठी टंचाई यामुळे प्रधानमंत्री सूर्योदय योजना अधिक लाभादायक ठरणार आहे .
शिवाय या योजनांमधून लाभ घेणारे लाभार्थ्यांस 24 तास विज वापरता येणार आहे . ही योजना ज्या लोकांपर्यंत वीज अजूनही पोहोलची नाही , अशा गरीब घरांकरीता राबविण्यात येणार आहेत . ज्यामुळे अशा गरीब घरांमध्ये कायमस्वरुपी वीजेचा पुरवठा होईल . या योजनांमध्ये , आपणास छतावर बसविण्यासाठी सोलार पॅनेल व वीज स्टोअर करण्याकरीता बॅटरी दिली जाईल .
या योजनाची अंमलबजावणी कधी होईल , व किती खर्च येईल : ही प्रधानमंत्री सुर्योदय योजनाची सुरुवात दिनांक 01 फेब्रुवारी 2024 च्या अर्थसंकल्पानंतर सुरुवात करण्यात येणार आहे . तर याकरीता एक किलावॅट क्षमतेचे सोलर पॅनेल सेटअप करीता 50,000/- ते 1,00,000/- रुपये इतका खर्च येतो तर 5 किलोवॅट क्षमतेच्या सेट-अपकरीता 2.25 ते 3.25 लाख रुपये पर्यंत खर्च येतो .सध्या केंद्र सरकार मार्फत सुरु असलेली नॅशनल रुफटॉप योजना अंतर्गत 40 टक्के अनुदान दिली जाते . तर या प्रधानमंत्री सुर्योदय योजना अंतर्गत तब्बल 50 टक्के ते 70 टक्के पर्यंत सबसीडी दिली जाणार आहे .