Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pradhan mantri crops insurance scheme shasan nirnay ] : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून घेण्यात आला आहे , याबाबत कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 15 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार , प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे .तर सदर शासन पुरकपत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र शासनांच्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे ..

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 मध्ये अधिसुचित क्षेत्रातील पिकांसाठी राज्यांमध्ये राबविण्यास दिनांक 26 जुन 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे . तसेच सदर योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024 करीता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै 2024 अशी निश्चित करण्यात आलेली आहे .

तथापि शेतकऱ्यांना सदर योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेवून योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनांच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय मार्फत दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना , खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत .

या संदर्भातील कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *