Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Office Interest Scheme ] : पती – पत्नी करीता भारतीय टपाल खात्याच्या खास सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास , आपणांस प्रतिमहा 9,250/- रुपये इतकी रक्कम व्याज स्वरुपात मिळेल . या योजनांची पात्रता , मिळणारे लाभ या याबाबत , सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस प्रतिमहा उत्पन्न योजनांमध्ये गुंतवणुक करुन आपण प्रतिमहा उत्पन्न मिळवू शकतो . या योजनांमध्ये वैयक्तिक , संयुक्त तसेच जॉइंट ( तीन व्यक्तीपर्यंत ) अशी खाते उघडता येते . या खात्यांमध्ये एक विशिष्ट रक्कम कमाल 5 वर्षे कालावधीकरीता गुंतवणुक करावी लागते . ज्यांमध्ये आपणांस प्रतिवर्ष 7.4 टक्के व्यादराने व्याज मिळते .

प्रतिमहा उत्पन्न अशाप्रकारे मिळते : आपण जर वैयक्तिक खाते उघडले असता , कमाल 9 लाख रुपये पर्यंतची रक्कम जमा करता येईल तर संयुक्त खात्यांमध्ये कमाल 15 लाख रुपये इतकी रक्कम जमा करता येईल . सदर गुंतवणूकीची मॅच्यूरिटी कालावधी हा 5 वर्षाचा असतो , त्यानंतर पुढील 5 वर्षे अशी असा कालावधी वाढवता येते .

या योजनांमध्ये आपण जर वैयक्ति खाते उघडून कमाल गुंतवणुक 9 लाख रुपये इतकी गुंतवणुक केल्यास आपणांस गुंतवणुकीच्या पहिल्या महिन्यापांसूनच 5550/- रुपये इतकी रक्कम प्रतिमहा मिळेल , तर संयुक्त खात्यांच्या उघडून त्यांमध्ये कमाल 15 लाख रुपये इतकी रक्कम गुंतवल्यास आपणांस प्रतिमहा 9,250/- रुपये इतकी रक्कम प्रतिमहा मिळेल .

पात्रता : या योजनांमध्ये गुंतवणुक करण्यासाठी कोणतीही भारतीय नागरिक या योजनांमध्ये गुंतवणुक करु शकते . अल्पवयीन मुलांच्या नावे पालक उघडु शकतील . तर अल्पवयीन मुलाचे वय हे 10 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक असणार आहेत .

मुदतपुर्व बंद करण्याची सुविधा : सदर योजना अंतर्गत आपणांस गुंतवणुकीनंतर एक वर्षे कालावधी पुर्ण झाल्यानंतर संपुर्ण रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आलेली आहे . ज्यांमध्ये 01 ते 03 वर्षापर्यंत सर्व पैसे काढल्यास अनामत रक्कमाच्या 02 टक्के इतकी रक्कम कपात करुन दिली जाते . तर 3 वर्षाच्या नंतर सर्व पैसे काढल्यास अनामत रक्कमेच्या 01 टक्के रक्कम कापूर पैसे परत केले जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *