Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post office Insurance Plan ] : पोस्ट ऑफीसच्या विमा योजनांमध्ये फक्त 520/- रुपये वार्षिक प्रिमियम वर तब्बल 10 लाख रुपयांचा विमा लाभ प्राप्त होतो , या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत .

भारतीय डाक विभागांने टाटा एआयजी कंपनीसोबत करार करुन विमा क्षेत्रांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे . या विमा योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे अत्यल्प प्रिमियमवर सर्वाधिक लाभ प्राप्त होतो . ज्यांमध्ये तब्बल दहा लाख रुपये पर्यंतचा विमा संरक्षण प्राप्त होते . या विमा योजनाचे प्रिमियम कमी असल्याने , देशातील गरिब / सर्वसाधारण जनतेला मोठा फायदा होणार आहे .

इंडियन पोस्ट पेमेंट बँक मार्फत टाटा एआयजी विमा पॉलीसी : या विमा पॉलिसी अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी विमाधारकाचे वय हे 18 ते 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , ही पॉलिसी पोस्ट ऑफीसच्या पेमेंट बँक व टाटा एआयजी अंतर्गत राबविण्यात येते .

या पॉलिसी अंतर्गत विमाधारकाच्या मृत्युनंतर विमा संरक्षण मिळते , त्याचबरोबर वैयक्ति अपघात विमा योजनांच्या उद्देशाने या पॉलिसी अंतर्गत संपुर्ण संरक्षण प्रदान होते . विमाधारकाचा मृत्यु झाल्यास , विमाधारकाच्या वारसांना 10 लाख रुपये पर्यंत लाभ मिळेल .तसेच गंभर अपंगत्व / मृत्यू , अपघात साठी विमा संरक्षण दिले जाते .  शिवाय सर्वसाधारण गरिबांना या पॉलिसीचा प्रिमियम परवडणार आहे .

लाभ कसा मिळेल : या पॉलिसी अंतर्गतर विमाधारकाचा मृत्यु झाल्यानंतर 10 लाख रुपये , तसेच कायमस्वरुपी संपुर्ण अपंगत्व आल्यास , 10 लाख रुपये तसेच कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व व अपघातामुळे अवयव गमावला असल्यास 10 लाख रुपये संरक्षण दिले जाते . तर अपघाती वैद्यकीय खर्च करीता 1 लाख रुपये पर्यंत लाभ मिळेल , या शिवय शैक्षणिक लाभ लाभ 5000/- रुपये मिळेल . तर अपघातानंतर दवाखान्यांसाठी 10 दिवसांपर्यंत 1000/- प्रति दिवस याप्रमाणे लाभ मिळेल .

याशिवय कुटुंबाचा अपघात दरम्यानचा खर्च म्हणून 25000/- रुपये इतका लाभ मिळेल , तर अंतिम विधी क्रिया करीता 5000/- रुपये दिले जाते , याशिवाय विमाधारक हा कोमामध्ये गेल्यास 1,00,000/- रुपये दिले जाते . या पॉलिसीचा लाभ घेण्याकरीता आपल्या जवळच्या डाक कार्यालयास भेट द्यावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *