Post Office : भारतीय डाक विभागाच्या खास महिलांकरीता टॉप 5 बचत योजना ; मिळत आहे सर्वाधिक आर्थिक लाभ ..

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ post office best savings scheme for women ] : भारतीय टपाल विभागात केलेली गुंतवणूक इतर वित्तीय बँका / वित्तीय संस्थांपेक्षा अधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . तरी या गुंतवणूक  इतर बँका / वित्तीय संस्था पेक्षा सर्वाधिक व्याज मिळतो . तर खास महिलांकरिता काही महत्त्वपूर्ण पाच बचत योजना खालील प्रमाणे जाणून घेवूयात ..

महिला सन्मान बचत योजना : सदर योजना अंतर्गत केवळ महिला गुंतवणूक करू शकतात , तर सदर योजने अंतर्गत किमान 1000/- रुपये तर कमाल 02 लाख रुपये जमा करू शकतात , यावर 7.5% व्याज मिळतो , याची मुदत दोन वर्ष इतके असते .

PPF : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून , या योजनेमध्ये किमान 500/-  रुपये ते एका वित्तीय वर्षात 150,000/- रुपये कमाल मर्यादित गुंतवणूक करू शकता , यावर पोस्टाकडून 7.1% व्याजदर मिळतो .

पोस्ट ऑफिस प्रतिमहा उत्पन्न योजना : सदर योजने अंतर्गत एकावेळी गुंतवणूक करून आयुष्यभर मासिक उत्पन्न मिळू शकता . यावर 7.4% इतके व्याज मिळते , तर किमान गुंतवणूक 1000 रुपये ते कमाल 9 लाख रुपये जमा करू शकता .

सुकन्या समृद्धी योजना :  मुलींचे 01 वर्ष ते 10 वर्ष असेपर्यंत सदर योजने अंतर्गत गुंतवणूक करू शकता , यामध्ये दरमहा किमान 250 /- पासुन गुंतवणूक करता येते , सदर योजना अंतर्गत पंधरा वर्षे पर्यंत गुंतवणूक करावी लागते , तर 21 व्या वर्षी सदर योजनेचे मुदत संपते .

ज्येष्ठ नागरिक बचत योजना : सदर योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना बचतीवर 8.2% व्याज मिळतो , या योजनेमध्ये किमान 1000/- रुपये ते 30 लाख रुपये पर्यंत रक्कम जमा करता येते , तर सदर बचत योजनेचा कालावधी हा 05 वर्षाचा असतो , तर पाच वर्षे संपल्यानंतर , परत Renew करता येते .

Leave a Comment