live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Office Best Investment Scheme ] : भारतीय डाक विभाग मार्फत दाम दुप्पट योजना राबविण्यात येते , यांमध्ये मुदत ठेवीपेक्षा अधिक व्याजदर उपलब्ध होतो . यामुळे गुंतवणुकदारांना पोस्टाच्या खाली नमुद योजना मध्ये गुंतवणुक करणे अधिक सोयीस्कर होईल.
किसान विकास पत्र ( KVP ) : केंद्र शासनाच्या पोस्ट विभागामार्फत किसान विकास पत्र ही योजना राबविण्यात येते , या योजना अंतर्गत कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय हे 18 वर्षे पुर्ण झाले आहे , अथवा अल्पवयीन असणाऱ्यांसाठी जॉईंट पद्धतीने यांमध्ये बचत करु शकता . या पुर्वी या बचत योजनांमध्ये फक्त शेतकरीच गुंतवणूक करु शकत होते , परंतु केंद्र सरकारने याची व्याप्ती वाढवून , सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे .
दाम दुप्पट : किसान विकास पत्राचे खास वैशिष्ट्ये म्हणजे दाम दुप्पट करणे , ज्यावेळी व्याजदरामध्ये वाढ होते , त्यावेळी मुदत कालावधी देखिल कमी होते . सध्या किसान विकास पत्राचे वार्षिक व्याजरद हे 7.5 टक्के इतके आहे , म्हणून 115 महिन्यांचा मुदत अवधी आहे , म्हणजेच आपण जर या बचत योजनांमध्ये 10 लाख रुपये जमा केले असता आपणांस 10 वर्षे 4 महिन्यानंतर ( 115 महिने ) 20 लाख रुपये मिळतील . जर व्याजदर वाढले तर सदर कालावधी देखिल कमी होईल .
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र VIII : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा म्यॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांचा आहे , यांमध्ये आपणांस 7.7 टक्के इतका व्याजदर मिळतो . जर आपण या योजनांमध्ये 10 लाख रुपये गुंतवले असता , आपणांस 5 वर्षे मुदतीनंतर 14,49,000/- रुपये इतकी रक्कम मिळेल .
वरील व्याजरद हे दिनांक 01 एप्रिल 2024 पासुन लागु करण्यात आलेले आहेत . वरील दोन्ही योजनांमध्ये आपणांस मुदत ठेवीपेक्षा अधिक आर्थिक होतो , यामुळे या पोस्टाची रिस्क फ्री योजनांमध्ये गुंतवणुक करणे अधिक सोयीस्कर असेल .