Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Office All Investment Scheme ] : भारतीय डाक विभाग अंतर्गत अनेक लाभदायक गुंतवणूक योजना राबविण्यात येतात , ज्यांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी लाभदायक अशा योजना राबविण्यात येतात . नेमक्या कोणत्या – कोणत्या योजनां डाक विभाग मार्फत राबविण्यात येतात , त्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..
01.महिला सन्मान बचत प्रमाणपत्र : या योजनांच्या माध्यमातुन 02 वर्षे कालावधीकरीता फक्त महिलांनाच कमाल 2,00,000/- रुपये इतकी गुंतवणूक करता येते . तर यांमध्ये किमान 1,000/- रुपये गुंतवणूक करुन देखिल लाभ घेवू शकता .. या गुंतवणुकीवर 7.5 टक्के इतका वार्षिक व्याजदर देण्यात येते .
02.राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व कृषी विकास पत्र : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये 5 व 10 वर्षे करीता गुंतणूक करता येते , तर कृषी विकास पत्रांमध्ये 10.4 वर्षे कालावधी करीता गुंतवणूक करता येते , ज्यांमध्ये किमान रक्कम 1000/- रुपये तर कमाल रक्कम 10 लाख रुपये इतकी गुंतवणूक करता येते . यामधील गुंतवणूकीवर 7.7 टक्के इतका वार्षिक व्याजदर मिळतो ..
03.भविष्य निर्वाह निधी ( PF ) : खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणारे तसेच गृहिणी यांच्या करीता भविष्य निर्वाह निधी योजनांमध्ये गुंतवणुक करणे अधिक लाभदायक असणार आहे . ज्यांमध्ये वार्षिक 150,000/- रुपये पेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही , सदरची गुंतवणुक ही 15 वर्षांकरीता असून ज्याचे वार्षिक व्याजदर हे 8.25 टक्के इतका आहे . यामुळे पी.एफ मधील गुंतवणूक अधिक फायदेशिर असेल .
04.ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ज्येष्ठ नागरिकांकरीता बचत योजना राबविण्यात येते , यांमध्ये किमान 1000/- रुपये तर कमाल 30 लाख रुपये इतकी गुंतवणूक करता येईल . ज्यांमध्ये आपणास 8.2 टक्के दराने व्याजदर मिळतो ..
05.मासिक उत्पन्न योजना : मासिक उत्पन्न योजनांमध्ये आपणांस मुदत ठेव स्वरुपात गुंतवणुक करावी लागेल , त्या रक्कमेच्या व्याजातुन मासिक पद्धतीने रक्कम अदा करण्यात येईल . ज्याचे व्याजदर हे 7.40 टक्के इतके आहे .