Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Polling Booth facility ] : मतदान केंद्रावर मतदान कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत , संबंधित तलाठी / ग्रामसेवक यांना कळविण्यात आलेले आहेत . या ठिकाणी नेमक्या कोण-कोणत्या सुविधा मिळणार आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अत्यावश्यक सुविधा : मतदान केंद्रावर अत्यावश्यक बाबीमध्ये वीज , पाणी , स्वच्छतागृहे तसेच आवश्यक तेथे मंडपाची व्यवस्था करण्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे . याशिवाय इतर सर्व प्रकारच्या सोयी सविधा संबंधित तलाठी / ग्रामसेवक यांना करण्याचे निर्देश आहेत .

याशिवाय पुरेसे फर्निचर , लाईट , पिण्याचे शुद्ध पाणी याची सोय करण्याची तरतुद आहे , याशिवाय ग्रामसेवक यांना साहित्य देवाण – घेवाण करीता नेमणूक करण्यात आलेली आहे . या सोबत संबंधित गावातील पोलिस पाटील सदर ग्रामसेवक / तलाठी यांच्या कामात सहाय्य करणार आहेत .

भोजन व्यवस्था : भोजन व्यवस्था ही संबंधित मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार , करण्यात येणार आहे . अन्यथा भोजनाची व्यवस्था ही संबंधित कर्मचाऱ्यांनाच करावी लागेल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *