PM YASASVI Scholarship 2023 : या विद्यार्थ्यांना सरकार देत आहे १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती! त्वरित अर्ज करा;

Spread the love

PM YASASVI Scholarship 2023 : सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. इयत्ता नववी पासून अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता आता प्रशासनाने यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया अशी नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली असून जे कोणी पात्र विद्यार्थी असतील त्यांच्याकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येईल. यासोबतच त्या माध्यमातून जे निवडले जातील त्यांना प्रत्येक वर्षाला 1 लाख 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. या संधी करिता आता देशभरातून तब्बल 15000 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

मराठा आरक्षणासाठी सरकारने फक्त हे काम करावे तरच मिळेल आरक्षण! पहा सविस्तर;

या माध्यमातून आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षेच्या नाविन्यपूर्ण आयोजनाची जबाबदारी दिली आहे. या योजनेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. तरी 29 सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख असेल जा नागरिकांचा आर्थिक दृष्ट्या वंचित पार्श्वभूमी अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय अशा प्रवर्गात समावेश होत आहे (PM YASASVI Scholarship scheme 2023). त्यांच्या मुलांसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा प्राथमिक उद्देश असून जे नागरिक आर्थिक दृष्ट्या वंचित गटात मोडत आहे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करण्या साठी हा कार्यक्रम प्रशासनाने आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत तब्बल 15000 विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला जाईल.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत निराशा! पहा महागाई भत्त्याचे महत्त्वाचे अपडेट;

Young Achievers Scholarship 2023 : या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यासाठी सुरुवातीला प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या ठिकाणी जर आपण रजिस्ट्रेशन केली नसेल तर वेबसाईट वरती नोंदणी करून घ्या. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला क्रेडेन्शियल्स वापरूनच लॉगिन करायचे आहे (PM YASASVI Scholarship scheme 2023 last date). त्या ठिकाणी शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेसाठी सुद्धा नोंदणी करून घ्या पुढील दिलेले आवश्यक माहिती अगदी तीन चुकता भरायचे आहे. त्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करा आणि हा जो अर्ज आहे तो सादर करा.

प्रशासन अंतर्गत ही परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये शंभर पर्यायी प्रश्न विचारले जातील या परीक्षेचा कालावधी हा दोन तास 30 मिनिटांचा असेल यासोबतच आपल्यालाही परीक्षा हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये देता येते. आता ही परीक्षा 29 सप्टेंबर रोजी घेतली जाणारा असून या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी व परीक्षेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू आहे (pm yasasvi scholarship exam date 2023). तरी त्वरित अर्ज करून घ्यावेत अर्ज करण्यासाठी कोणतीही फी द्यायची गरज नाही विद्यार्थ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्वरित ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment