प्रधानमंत्री सर्वसमावेशक पीक विमा योजना ; जाणून घ्या पिकांचे नुकसान व शेतकऱ्यांना मिळणारे विमा संरक्षण लाभ !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Sarvsamaveshak crops insurance ] : शेतकऱ्यांना प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यांस त्यांना विमा संरक्षण देण्याची तरतुद ही सर्वसमावेशक पिक विमा योजनांमध्ये करण्यात आलेली आहे . यांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण लाभ दिले जाते , या योजनांबाबत सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे घेवूयात .

खरीप / रब्बी हंगामाकरीता जोखमीच्या बाबी : यांमध्ये प्रतिकुल हवामानामुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान या बाबींचा देखिल समावेश असेल , तसेच पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान या बाबींकरीता देखिल विमा संरक्षण दिले जाते .

त्याचबरोबर पिक पेरणी ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग , वीज कोसळणे , गारपीट , वादळ , चक्रिवादळ , पुर क्षेत्र , जलमय होणे , भुस्खलन दुष्काळ , पावसातील खंड , किड व रोग इ. बाबींमुळे उत्पनांमध्ये होणारी घट या बाबींकरीता देखिल विमा संरक्षण दिले जाते .

तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या बाबींकरीता देखिल विमा संरक्षण दिले जाते .या पुर्वी शेतकऱ्यांना 2 टक्के खरीब तर 1.5 टक्के रब्बी तर नगदी पिकांकरीता 5 टक्के विमा हप्ता भरावा लागत हेाता , आता शेतकरी विमा हप्ता हिस्सासुद्धा राज्य शासनांकडून भरण्यात येतो .

नोंदणी करणे आवश्यक : या योजना अंतर्गत विमा संरक्षण घेण्याकरीता शेतकऱ्यांना फक्त 1 रुपये भरुन pmfby.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल .

Leave a Comment