Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ PM Kisan Yojana niti ayog evaluation news ] : निवडणूकीच्या नंतर पीएम किसान सन्मान निधी योजना बंद होणार कि काय असा प्रश्न सर्वांना पडत आहे , कारण निती आयोगांकडून सदर योजनांचे मुल्यांकन करण्यात येत आहेत .
सदर योजना अंतर्गत केंद्र सरकारमार्फत पात्र शेतकऱ्यांना 6000/- रुपये वार्षिक ( 3 हप्यांमध्ये ) अदा करण्यात येते , सदर योजनांची सुरुवात ही केंद्र सरकारकडून सन 2019 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे . ज्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना 2,000/- रुपये हप्यांसह वार्षिक 3 हप्यांमध्ये 6,000/- रुपयांचा सन्मान निधी वितरीत करण्यात येते . जे कि शेतकऱ्यांना पिकांची पेरणी , काढणी इ. कामागांसाठी उपयोगी पडते .
मिळालेल्या माहितीनुसार सदर योजनांचा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे . आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत . तर आता लोकसभा निवडणूका संपल्याच्या नंतर सदर किसान सन्मान निधी योजनांचे निती आयोग मार्फत मुल्यांकन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .
सदर मुल्यांकनाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे केंद्रीय स्तरावर सदर योजनांची समीक्षा करणे , यामुळे सदर योजना बंद होणार कि काय अशीही भिती निर्माण होत आहे . कोणतीही योजना विशिष्ट कालावधी करीता सुरु ठेवली जाते , विशिष्ट कालावधीनंतर सदर योजनांचे उद्दिष्ट्ये साध्य झाल्याच्या नंतर योजनांमध्ये अमुलाग्र बदल अथवा बंद केले जाते .
योजनांमध्ये अमुलाग्र बदल होण्याची शक्यता : सदर योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना वार्षिक 6,000/- रुपये प्राप्त होत आहेत , परंतु शेतमालाला योग्य भाव , खतांचे वाढते किंमत यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखिल नाराजगी आहे , यामुळे सदर योजनांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे .