Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana new update news ] : कृषी तज्ञांकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाला परत 2,000/- रुपयांची वाढ करण्याची विनंती अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या कडे करण्यात आली आहे . सध्याच्या घडीला या योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्राप्त होते .
या योजनाची सुरुवात केंद्र सरकारकडून दिनांक 24.02.2019 रोजी सुरु करण्यात आली असून , या योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रुपये 6,000/- ( 2000/- रुपये हप्त्याप्रमाणे ) वर्षाला दिले जाते . या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी देशातील कोणताही शेतकरी अटींची पुर्तता करणारा लाभार्थी ठरतो .
सदर प्रधानमंत्री किसान योजनेच्या रक्कमेत आणखीण 2000/- रुपयांची वाढ करण्याची मागणी कृषी तज्ञांकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना प्रत्यक्ष भेटून सदरची रक्कम वाढविण्याची विनंती करण्यात आलेली आहे . या योजना अंतर्गत आतापर्यंत देशातील सुमारे 11 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तब्बल 3.04 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अदा करण्यात आलेली आहे .
सदर योजनांच्या रक्कमेत वाढ करण्याची केंद्र शासनांची धारण असल्याचे दिसून येते , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सुत्री हाती घेतल्यानंतर लगेचच पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता अदा करण्यात आला .
अर्थसंकल्प 2024 मध्ये वाढीव निधीची तरतुद करण्याची मागणी : केंद्र शासनांच्या नविन अर्थसंकल्पांमये थेट लाभ हस्तांतरण व कृषी संशोधनाकरीता वाढीव निधी देण्याची विनंती करण्यात आलेली आहे , ज्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनांमध्ये 2,000/- रुपयांपर्यंत वाढ करता येईल , अशी मागणी करण्यात आलेली आहे .
यंदाच्या वर्षाकरीता कृषी मंत्रालयासाठी 1.27 लाख कोटी रुपयांचे बजेट देण्यात आलेले आहे , तर सदर निधी हा कृषी क्षेत्रासाठी पुरेसा होणार नाही असे कृषी तज्ञांकडुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सांगितले आहेत .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !