Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ pm kisan yojana New Status Update News ] : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बाबत केंद्र सरकारकडून नविन अपडेट देण्यात आलेली आहे , सदर यांमध्ये शेतकऱ्यांचे अपडेट स्थिती पाहता येणार आहे , तसेच यांमध्ये लाभार्थी यादी पाहता येणार आहे .

सध्या पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 16 हप्ते अदा करण्यात आलेले आहेत , आचार संहितामुळे 17 वा हप्ता बाकी आहे , सदर 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत . याकरीता सदर योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्यांनी ई-केवायसी करणे करणे बंधनकारक असणार आहेत , याकरीता शेतकऱ्यांना आपले स्टेटस पाहता येणार आहेत , तसेच ऑनलाईन पेमेंट यादी पाहता येणार आहेत .

तसेच पीएम किसान योजनांच्या ऑनलाईन संकेतस्थळावर काही नविन अपडेट शो करण्यात आलेली आहे . यांमध्ये Name Correction As per Adhar हे ऑप्शन नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत , यांमध्ये आपले नावांमध्ये बदल करायचा असेल तर बदल करु शकता , तसेच Know Your Status हे नव्याने ऑप्शन देण्यात आलेले आहेत , ज्यांमध्ये आपले स्टेटस पाहता येणार आहे .

तसेच Voluntary Surrender of PM Kisan Benefits हे नव्याने ऑप्शन देण्यात आलेले आहेत , यांमध्ये जे कोणी सदर योजनांमधून आपले लाभ आत्मसमर्पण करु इच्छत आहेत ,त्यांनी नोंदणी करुन आत्मसमर्पण करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे .तसेच PM KISAN MOBILE APP डाऊनलोड करण्याची सुविधा देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

यांमध्ये आपणांस पुर्वीपासुन लाभार्थी यादी , नव्याने शेतकऱ्यांची नोंदणी अशा प्रकारचे ऑप्शन पाहता येईल .पीएम किसान सन्मान योजनेची अधिकृत्त संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ ही आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *